Vanilla Strawberry & Chocolate – (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट)

Vanilla Strawberry & Chocolate – (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट)

Posted by mediaone - in 2018 - Comments Off on Vanilla Strawberry & Chocolate – (व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट)

शीर्षकापासून कथानकापर्यंत वेगळेपण जपणारा ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दर्जेदार कथानक, कलाकारांची जमलेली उत्तम भट्टी आणि माथेरानची नयनरम्य लोकेशन्स यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. मराठी चित्रपटात कधीही हाताळला न गेलेला विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची नायिका तेजू आणि तिची जिवलग मैत्रीण व्हॅनिला यांच्या मैत्रीभोवती या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. तेजू आणि व्हॅनिलाची भेट, त्यांच्यात फुलत जाणारे मैत्रीचे बंध आणि एका क्षणी त्याला मिळणारं अनपेक्षित वळण याचं उत्तम चित्रण या चित्रपटात आहे. मैत्री, प्रेम, जिव्हाळा या भावना केवळ मानवी पातळीवर मर्यादित न ठेवता त्यांच्या कक्षा प्राणीमात्रांशीही निगडीत असू शकतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश विश्वनाथ यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. जानकी पाठक ही नवोदित अभिनेत्री या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहे. त्याचसोबत रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव या कलाकारांनी ही चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन गिरीश विश्वनाथ यांचे आहे. चित्रपटातली गीते जावेद आली, उपग्ना पंड्या आणि ऋतुजा लाड यांनी गायली असून शंतनू हेर्लेकरांनी ती गाणी संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सुनील निचलानी आहेत.

एक वेगळा चित्रपट बघायची इच्छा असेल तर उद्या चित्रपटगृहात ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अॅंड चॉकलेट’ नक्की बघा.

Comments are closed.