Tula Pan Bashing Bandhaychay – तुला पण बाशिंग बांधायचं

Tula Pan Bashing Bandhaychay – तुला पण बाशिंग बांधायचं

Posted by mediaone - in 2018 - Comments Off on Tula Pan Bashing Bandhaychay – तुला पण बाशिंग बांधायचं

समाजातील विविध समस्या मांडून त्याद्वारे समाजप्रबोधनाचा प्रयत्न अनेक मराठी चित्रपटांमध्ये झाला आहे.‘जयलक्ष्मी वैष्णवी फिल्म प्रोडक्शन’ यांची प्रस्तुती असलेल्या तुला पण बाशिंग बांधायचंय  या चित्रपटातून स्त्रीसमस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पती-पत्नी नाते, कुटुंबव्यवस्था यावर भाष्य करत तरुणांच्या वैवाहिक आयुष्यातल्या उणीवा आणि त्यातून भविष्यात उद्भवणा-या समस्या यात मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती भानुदास व्यवहारे व दत्तात्रेय मोहिते यांनी केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी भानुदास व्यवहारे यांनी सांभाळली आहे. तुला पण बाशिंग बांधायचंय  हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

तुला पण बाशिंग बांधायचंय ही कथा आहे वर्षा आणि आकाश या तरुण जोडप्याची. एकमेकांच्या पसंतीने लग्न ठरलेल्या या दोघांच्या आयुष्याला लग्नानंतर अचानक कलाटणी मिळते. या कलाटणी नंतर वर्षा आणि आकाशाचं आयुष्य कोणतं वळण घेत याची हृदयस्पर्शी कथा या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यातील समस्या, मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्या आई-वडिलांचे दृष्टिकोन यासोबत समाजाची मानसिकता या सगळ्यांवर चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या धाटणीची पाच गीते या चित्रपटात आहेत. भानुदास व्यवहारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीतांना संगीतकार एँग्नेल रोमन यांचा संगीतसाज लाभला आहे. वैशाली माडे, सुहास सावंत, प्रसन्नजित कोसंबी यांनी यातील गीते गायली आहेत. संगीत संयोजन विलास गुरव यांचे आहे.

विक्रम गोखले, सुरेश विश्वकर्मा, यतिन कार्येकर, सुनील गोडबोले, भक्ती चव्हाण, श्वेता खरात, सुवर्णा काळे, रितेश नगराले, राहूल पाटील, हर्षा शर्मा, अर्जुन जाधव, शंकर सूर्यवंशी हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते अभय भंडारी, प्रमोद वेदपाठक, सुभाष चव्हाण,औदुंबर व्यवहारे असून सहदिग्दर्शन निशांत आडगळे यांनी केले आहे. कथा,पटकथा,संवाद भानुदास व्यवहारे यांचे आहेत. छायांकन सिद्धेश मोरे यांनी तर संकलन माधव शिरसाट यांचे आहे. ध्वनीमुद्रण कीर्ती पांचाळ यांचे असून ध्वनीआरेखन प्रमोद चांदोरकर यांनी  केले आहे. रंगभूषा- वेशभूषा कुमार मगरे यांची आहे.

तुला पण बाशिंग बांधायचंय आज प्रदर्शित झाला आहे.

Comments are closed.