BOLA ALAKH NIRANJAN- (बोला अलखनिरंजन)

BOLA ALAKH NIRANJAN- (बोला अलखनिरंजन)

Posted by mediaone - in 2018 - Comments Off on BOLA ALAKH NIRANJAN- (बोला अलखनिरंजन)

महाराष्ट्र सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. विविध पंथ आणि संप्रदायांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. महाराष्ट्रात उगम होऊनही केवळ महाराष्ट्रापुरता सीमित न रहाता संपूर्ण भारतभर ज्या संप्रदायाचे उपासक आपल्याला आढळतात तो संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाचा हा महिमा आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. उद्या २८ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या बोला अलखनिरंजन या चित्रपटाच्या माध्यमातून नाथसंप्रदायाचा महिमा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मातृपितृ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घन:श्याम येडे यांनी सांभाळली आहे.

 

नाथसंप्रदायाची शिकवण आणि सध्याची युगात त्यांची असलेली कालसुसंगता यांचा मेळ या चित्रपटात घालण्यात आला आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांच्या चरित्रावर आधारित चित्रपट निर्मित करण्यात आला आहे. मच्छिंद्रनाथांच्या आयुष्यातील चमत्कृतीपूर्ण घटनांचा प्रेक्षकांना अनुभव घेता यावा यासाठी या चित्रपटात व्हीएफएक्स चे तंत्र खुबीने वापरण्यात आले आहे. ‘इच्छाशक्तीला भक्तीची जोड मिळाली तर अशक्य काहीच नसतं’, याची प्रचीती हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना येईल.

नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ आणि नवनाथांच्या आयुष्यातल्या चमत्कृतीपूर्ण घटना आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यची नवनाथांवरची भक्ती यांची अध्यात्मिक सांगड  बोला अलखनिरंजन’  या चित्रपटात घालण्यात आली आहे.  अमोल कोल्हे,  सिया पाटील,  नागेश भोसले,  दिपक शिर्के,  दिपाली सय्यद,  गायत्री सोहम,  मिलिंद दास्ताने,  प्रफुल्ल सामंत, रोहित चव्हाण, भक्ति बर्वे आणि घन:श्याम येडे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

या चित्रपटाचे सहनिर्माते सतु कृष्णा केणी (बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी), शिवाजी घमाजी दडस (अनमोल निर्मिती सहकार्य) आहेत. अमोल येवले, विष्णुपंत नेवाळे प्रसिद्धी निर्मिती सहाय्यक आहेत. कथा, पटकथा व संवाद घन:श्याम येडे यांनी लिहिले आहेत. संगीत विशाल बोरूळकर तर पार्श्वसंगीत सुरज यांचे आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन दिपक विरगुट आणि विलास रानडे यांचे आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी  भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे. वेशभूषा, कार्यकारी निर्मात्या चैत्राली डोंगरे आहेत. रंगभूषा किरण सावंत यांची आहे. नृत्यदिग्दर्शन  बॉबी खान , संग्राम  भालेकर  यांनी  केले आहे. ध्वनी  संयोजनाची  जबाबदारी  अनिल निकम व कैलास पवार यांनी सांभाळली असून व्हि.एफ.एक्स रितेश दप्तरी यांचे आहे. सहदिग्दर्शन चार्ल्स गोम्स, संदीप शितोळे यांनी केले आहे.देवदास भंडारे, दिपक साळुंखे यांचे कलादिग्दर्शन आहे. शिवाजी दडस आणि नारायण माळशिकारे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती सहाय्यक संजय कोळी,  योगेश टेंमगिरे आहेत. निर्मिती व्यवस्था अनिरुद्ध दुभाषी, श्रीकांत बडवे (महाजन) यांची आहे.

उद्या २८ डिसेंबरला ‘बोला अलखनिरंजन’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

Comments are closed.