‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग

‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग

Posted by mediaone - in Events - Comments Off on ‘होते कुरूप वेडे’ नाटकासाठी अनोखा प्रयोग

प्रत्येक कलाकृतीसाठी शीर्षक  ही पहिली पायरी असते. कलाकृती निर्माण करणे जितके आव्हानात्मक; तितकेच किंवा त्याहून कठीण काम म्हणजे तिचे नामकरण करणे. शीर्षकातून कलाकृतीचा संपूर्ण गाभा व्यक्त होत असतो. नावात काय आहे ?  असा सवाल शेक्सपिअरने विचारला होता. पण नावाला असे दुर्लक्षित करता येत नाही. नावची  हीच किमया लक्षात घेऊन होते कुरूप वेडे या नाटकाच्या शीर्षकासाठी  खास प्रेक्षक मतांचा कौल घेण्यात आला.

या  नव्या  प्रयोगाबद्दल बोलताना  राजेश  देशपांडे  सांगतात  कि,  शीर्षकामधून  नाटकाचा संपूर्ण विषय व आशय सांगता येतो. नाटकाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी शीर्षक सुद्धा तितकीच मोलाची भूमिका बजावतात. या  विचारातून आम्ही  प्रेक्षकांना दोन-चार शीर्षकांचे पर्याय उपलब्ध करून दिले. व प्रेक्षकांच्या मतानुसार आम्ही आमच्या नाटकाचे शीर्षक ठेवले. नाटकाच्या जाहिरातीतही उलट्या अक्षरांची गंमत करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्याचा प्रयत्न या नाटकाने केला असून विचित्र फोटो काढण्याचे अनोखे कॅम्पेन ही या  नाटकाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आले. त्या कॅम्पेनला ही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या प्रत्येक नावाचे स्वतःचे वेगळेपण असते. हा वेगळेपणा आम्ही आमच्या शीर्षकातूनही जपला आहे. रंग, वर्ण हा काही कुणाच्या हातात नसतो. पण आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही याचा विचार करणारे अधिक आहेत याच मनोवृतीवर प्रकाश टाकणारे होते कुरूप वेडे हे नाटकं आहे. संजय नार्वेकर या नाटकात मध्यवर्ती  भूमिकेत असून  त्यांच्या सोबत  नयन जाधव, भारत सावले, शलाका पवार, नितीन जाधव, मिनाक्षी जोशी, कल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.

डिएसपी एन्टरटन्मेंट प्रा.लि. निर्मित होते कुरूप वेडे या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार राजेश देशपांडे असून निर्माते दादासाहेब पोते आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत आमीर हडकर यांचे आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. मंगेश नगरे हे नाटकाचे कार्यकारी निर्माते आहेत. नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग ११ जानेवारीला, शिवाजी मंदीर, दादर येथे दुपारी ३.३० वाजता होणार आहे.

Comments are closed.