‘स्वामीधाम कलाश्रय’ ची घोषणा – सहकार्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचे कलाकार व रसिकांना आवाहन

‘स्वामीधाम कलाश्रय’ ची घोषणा – सहकार्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचे कलाकार व रसिकांना आवाहन

Posted by mediaone - in News - Comments Off on ‘स्वामीधाम कलाश्रय’ ची घोषणा – सहकार्यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदारचे कलाकार व रसिकांना आवाहन

कलाकार आपल्या आविष्कारातून प्रेक्षकांना आनंद देत असतो. हाच आनंद कलाकारांना त्यांच्या उतारवयात मिळावा यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक पाऊल पुढे टाकत स्वामीधाम कलाश्रयची संकल्पना मांडत ती प्रत्यक्षात उतरवली. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर स्वामीधाम कलाश्रय या वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच रोवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीफळ वाढवून व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. स्वामीधाम कलाश्रय संस्थेचे सर्वेसर्वा श्री.चिंतामणी रहातेकर काका यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामीसचिन मोटेअभिनेते पंढरीनाथ कांबळेसुशील इनामदारनिरंजन कुलकर्णी तसेच या संस्थेच्या कामासाठी विशाखा सुभेदार यांच्या पाठीशी असणारे महेश सुभेदार,जगदीश हडपनिलेश आंबेकर आदि असंख्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार म्हणाल्या की‘अभिनय आणि सामजिक कार्य यांची सांगड घालत समाजासाठी विशेषतः कलाकारांसाठी भरीव काहीतरी करण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने स्वामीधाम कलाश्रयची कल्पना सुचली आणि स्वामींच्याच इच्छेने चिंतामणी रहातेकर काका यांचा सहकार्याचा हात व अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळाले. आता मी हाती घेतलेल्या या कामासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणारीया कलाश्रयसाठी झटणाऱ्या कलाकार मंडळीं व जनसामान्यांची साथ मला हवी आहे. सामाजिक कर्तव्यभावनेतून या उपक्रमाला अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन विशाखा यांनी याप्रसंगी केले.

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळअंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रजआनंदवाडीकर्जत येथे या स्वामीधाम कलाश्रय वृद्धाश्रमासाठी जागा मिळाली आहे. या मान्यताप्राप्त संस्थेच्या अन्नछत्राचे उद्घाटन झाले असून भविष्यात स्वामीधाम कलाश्रय या नावाला साजेसे नाट्य कार्यशाळा,  वाचनालयबागकाम, स्विमिंग पूलपरफॉर्मिंग हॉल, विविध खेळविरंगुळा असे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. त्यासाठीच कलाकारांच्या व रसिकांच्या सहकार्याची गरज आहे. या उपक्रमासाठी आवश्यक त्या कायदेशीरबाबींची पूर्तता सुरु असून vish22377@gmail.com या ईमेलआयडीवर संपर्क साधून या उपक्रमाला आर्थिक पाठबळ व नियोजनाच्या काही सूचना असल्यास त्या कळविण्याची विनंती विशाखा सुभेदार यांनी कलाकार व रसिकांना केली आहे.

Comments are closed.