‘साईसेवक’ मंडळाच्या साईपालखी पदयात्रेला प्रारंभ

‘साईसेवक’ मंडळाच्या साईपालखी पदयात्रेला प्रारंभ

Posted by mediaone - in News - Comments Off on ‘साईसेवक’ मंडळाच्या साईपालखी पदयात्रेला प्रारंभ

काही साईभक्तांनी काही वर्षांपूर्वी मुंबई ते शिर्डी पदयात्रा सुरू केली. साईबाबांची पालखी घेऊन या मंडळांतील हजारो भक्त श्री रामनवमीच्या उत्सवासाठी दरवर्षी  नित्यनेमाने शिर्डीला जातात. या मंडळाचे नाव आहे… साईसेवक मंडळ. १९८१ साली स्थापन झालेल्या आणि सर्वप्रथम पदयात्रा सुरु करणाऱ्या या साईसेवक मंडळच्या साईपालखी भव्य पदयात्रेचा शुभारंभ आज बुधवार ३ एप्रिलला झाला.

दादर परिसरातून या पालखीचे उत्साहात प्रस्थान झाले. साईनामाचा जयघोष ढोलता-शाच्या गजरात व विविध वादयवृंदाच्या निनादात शेकडो भक्तगण या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. मनसे प्रमुख मा. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते पुजन व माध्यान्ह आरती संपन्न होऊन पदयात्रा शिर्डीकडे रवाना झाली. साईभक्तांनी प्रत्येक चौकात रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून या पालखीचे स्वागत केले. पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या पदयात्रेत साईसेवक मंडळाचे हजारो कार्यकर्ते,साईभक्त अनेक मान्यवर मंडळी सहभागी झाली आहेत.

Comments are closed.