SAVITA DAMODAR PARANJPE – (सविता दामोदर पराजंपे)

SAVITA DAMODAR PARANJPE – (सविता दामोदर पराजंपे)

Posted by mediaone - in 2018, News - Comments Off on SAVITA DAMODAR PARANJPE – (सविता दामोदर पराजंपे)

भय, उत्‍कंठा आणि रहस्‍य यांची सांगड असलेले गूढ, रहस्यप्रधान चित्रपट कायमच प्रेक्षक पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकांची हीच पसंती लक्षात घेत असाच एक रहस्यमय थरारपट हाताळण्याचा प्रयत्न निर्माता जॉन अब्राहम आणि दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी यांनी सविता दामोदर पराजंपे या चित्रपटाच्या माध्यमातून केला असून त्यांची ही कलाकृती ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शेखर ताम्हाणे दिग्दर्शित सविता दामोदर परांजपे हे नाटक १९८५ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. आजच्या पिढीला हा अनुभव घेता यावा याकरीतासविता दामोदर परांजपे हे नाटक सिनेमाच्या रूपात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न निर्माता व दिग्दर्शकांनी केला आहे.

सविता दामोदर पराजंपे ‘ची कथा शरद आणि कुसुम या दांपत्‍याभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्‍कारिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्‍यामुळे त्याच्या जीवनाला वेगळे वळण मिळत यामागील गूढ आणखी वाढत जाते. या घटनांमुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतो. या दांपत्‍याचा संसार कोण उद्ध्वस्त करु पाहत आहे? यापासून त्यांचा बचाव कोण करतो?विज्ञान आणि अमानवी शक्ती या दोन्ही गोष्टींचा वापर करत यामागे नेमके कोण आहे?  हे शोधण्याचा प्रयत्न या दाम्पत्यांकडून केला जातो. हे दाम्पत्य या घटनांना कसे सामोरे जाते? एकामागोमाग घडणा-या घटनांची उकल करण्यात या दाम्पत्याला यश मिळणार का?  या साऱ्या प्रश्नांची उत्तर आपणाला पडद्यावर पाहावे लागतील.

या चित्रपटाच्या निमित्ताने जॉन अब्राहम आणि अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांची निर्मिती व वितरण करणारे ‘पॅनोरमा स्टुडिओज’चे कुमार मंगत पाठक यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि‘पॅनोरमा स्टुडिओज’ सविता दामोदर परांजपे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. उत्तम संहितेसोबत संगीत व गाण्याचा वेगळा बाज या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.

Comments are closed.