समाजातल्या विकृतीवर भाष्य करणारा ‘युथट्यूब’

समाजातल्या विकृतीवर भाष्य करणारा ‘युथट्यूब’

Posted by mediaone - in News - Comments Off on समाजातल्या विकृतीवर भाष्य करणारा ‘युथट्यूब’

समाजात स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक, त्यांच्यासोबत केले जाणारे गैरव्यवहार ही विदारक परिस्थिती बघता ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या विधानासमोर प्रश्नचिन्ह उभे रहाते. घरात, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, शाळेत प्रत्येक ठिकाणी महिलांना अनेकदा अपमानास्पद आणि घृणास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. याच परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारा ‘मिरॅकल्स अकॅडमी’ प्रस्तुत आणि प्रमोद प्रभुलकर दिग्दर्शित  युथट्यूब‘ हा चित्रपट १ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे आणि त्या विरोधात महिलांनीच काहीतरी ठोस पावलं उचलायला हवी. महिला सबलीकरण हे केवळ बोलण्यापुरती मर्यादित न रहाता आचरणातही आणले गेले पाहिजे. जे हात लाटणं धरू शकतात तेच हात वेळ पडल्यास हातात शस्त्र ही घेऊ शकतात, गरज असते ती केवळ स्वतःतील आंतरिक शक्तीला जागं करण्याची. स्वसंरक्षणासाठी स्वतःला कणखर करण्याची. हाच संदेश देत,  स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देणारा युथट्यूब हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

स्त्रियांच्या सामाजिक समस्यांवर भाष्य करत असताना सोशल मीडियाचा वापर करताना ‘अखंड सावध असावे’ हा संदेशही चित्रपट तरुण पिढीला देतो. सोशल मीडियासारखे दुधारी शस्त्र आजच्या पिढीच्या हातात आहे. त्याचा विघातक वापर करण्यापेक्षा विधायक वापर करायला हवा. खटकणाऱ्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला हवा. अशा असंख्य पैलूंना स्पर्श करत युथट्यूब चित्रपटाची कथा खुलत जाते.

युथट्यूब या चित्रपटात ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अॅकडमी’तील ३०० विद्यार्थी झळकणार आहेत. शिवानी बावकर, पूर्णिमा डे, शर्वरी गायकवाड, मृण्मयी कुलकर्णी, सिद्धांत धोत्रे, विनय रावल, रतीश आरोलकर, अनिकेत वाघ आदि कलाकारांसोबत मधुराणी प्रभुलकर यात पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मिरॅकल्स फिल्म्स प्रस्तुत आणि प्रमोद प्रभुलकर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित युथट्यूब या चित्रपटाची सहनिर्मिती मयुरपंख मिडिया आणि इन्फ्रा असोसिएटस् (संजीव पेठकर, डॉ. शशांक भालकर),  अविनाश कुलकर्णी, रजनी प्रभुमिराशी,डॉ.फाल्गुनी जपे,  अरुणा जपे, सुधीर कुन्नुरे, प्रशांत लाल, अहमद शेख, स्वाती येवले, गिरीश नायर, वैशाली कासारे,  अनिकेत कुलकर्णी,  विवेक बावधाने, डॉ.संदीप कुलकर्णी, सागर पुजारी, वैशाली देवकर, सुखद बोरकर, सोनाली लोणकर, श्रीहरी पंचवाडकर आणि मेसर्स बी.एन.आर तर्फे भालचंद्र बोबडे, प्रवीण नेवे, गजानन रहाटे यांची आहे.

छायांकन सचिन गंडाकुश तर संकलन प्रमोद काहार यांचे आहे. कलादिग्दर्शन संजय कांदेकर यांनी केले आहे. रंगभूषा सौरभ कापडे यांची तर रंगभूषा मधुराणी प्रभुलकर यांची आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकर, सायली केदार, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज शिखा जैन,  आर्या आंबेकर,  सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे.

१ फेब्रुवारीला युथट्यूब प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.