संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव ७ ते ९ एप्रिल दरम्यान रंगणार – अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड

संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव ७ ते ९ एप्रिल दरम्यान रंगणार – अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड

Posted by mediaone - in News - Comments Off on संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव ७ ते ९ एप्रिल दरम्यान रंगणार – अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड

अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष-संस्थांपक चंद्रशेखर सांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेला संस्कृती कलादर्पण चा   त्रीदिवसीय नाट्य महोत्सव सोहळा ७ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान माटुंगाच्या यशवंत नाट्यगृहात रंगणार आहे. संस्कृती कलादर्पणनाट्यमहोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे.

यंदाच्या स्पर्धेत एकूण २४ नाटकांनी सहभाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी त्यातून पाच नाटकांची निवड झाली असून, यात ‘गलतीसे मिस्टेक’, तिला काही सांगायचे आहे’ ‘दादा एक गुड न्यूज आहे’ ‘सोयरे सकळ’,‘गुमनाम है कोई’ या नाटकांचा समावेश आहे. नाट्य महोत्सवातील पहिले नाट्य पुष्प ‘गलतीसे मिस्टेक’ या नाटकाने गुंफले जाणार असून सांगता ‘गुमनाम है कोई’ या नाटकाद्वारे होणार आहे.

प्रेक्षकांना मतदानाद्वारे या पाच नाटकांमधील सर्वोत्कृष्ट नाटक निवडण्याचा अधिकार असणार आहे. या स्पर्धेचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. या नाट्यमहोत्सवाच्या स्पर्धेचे परीक्षक विजय गोखले, प्रमोद पवार, गुरुदत्त लाड,आणि रोहिणी निनावे यांनी काम पाहिले.

रविवार ७ एप्रिल रात्रौ ८.०० वा. ‘गलतीसे मिस्टेक

सोमवार ८ एप्रिल दुपारी ४.०० वा. ‘तिला काही सांगायचे आहे

सोमवार ८ एप्रिल रात्रौ ८.०० वा. ‘दादा एक गुड न्यूज आहे

मंगळवार ९ एप्रिल दुपारी ४.०० वा. सोयरे सकळ

मंगळवार ९ एप्रिल रात्रौ ८.०० वा.  गुमनाम है कोई

Comments are closed.