वन वे तिकीट – One Way Ticket

वन वे तिकीट – One Way Ticket

Posted by Manish - in 2016 - Comments Off on वन वे तिकीट – One Way Ticket

मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. चित्रपटात काय वेगळे पाहायला मिळणार याची उत्कंठा वाढवण्यातही मराठी चित्रपटांचे पाऊल सातत्याने पुढे पडत आहे.मराठीतील अनेक ग्लॅमरस सुपरस्टार, चित्रपटातील भन्नाट लोकेशन, आणि हटके कथा या त्रिवेणी संगमामुळे सध्या चर्चेत असलेला ‘व्हिडीओ पॅलेस’ व ‘मेकब्रॅंड’ प्रस्तुत वन वे तिकीट हा सिनेमा २३ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतं आहे. युवा निर्मात्या कोमल उनावणे यांनी वन वे तिकीट चित्रपटाच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरणाचा प्रयत्न केला आहे.

वन वे तिकीट या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरचा त्यांचा प्रवास यावर बेतलेले असून त्यात अनपेक्षित घटनांचे खिळवून ठेवणारे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. एका रहस्यभेदाभोवती या सिनेमाची कथा फिरते. हा रहस्यभेद कशाप्रकारे उलगडला जातो याची रंजक कथा वन वे तिकीट सिनेमातून दिग्दर्शक कमल नथानी व अमोल शेटगे यांनी मांडली आहे. हा चित्रपट म्हणजे एक प्रवास आहे, काही एकत्र येणाऱ्या गोष्टीचा, नियतींचा…एक थरारक, रोमांचक प्रवास. या सिनेमाची खासियत म्हणजे सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण इटली, फ्रान्स, स्पेन या नयनरम्य ठिकाणी झाले असून क्रुझवर चित्रित केला गेलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील तरुणाईला रिफ्रेश करणारं झालंय. ‘बेफिकर’ आणि ‘रेश्मी रेश्मी’ या दोन गीतांना चांगल्या हिट्स मिळाल्या आहेत. अश्विनी शेंडे, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकरलेल्या यातील गीतांना गौरव डगांवकार यांनी संगीतबद्ध केलं आहे. पार्श्वसंगीत ट्रॅाय आरीफ यांचं आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. आनंदी जोशी, सावनी रवींद्र, रोहित राऊत, श्रीनिधी घटाटे, गौरव डगांवकर, क्षितीज वाघ, अरुणिमा भट्टाचार्य, शीफा हरीस यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.

वन वे तिकीट या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरचा त्यांचा प्रवास यावर बेतलेले असून त्यात अनपेक्षित घटनांचे खिळवून ठेवणारे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, शशांक केतकर, नेहा महाजन असे मराठीतील ग्लॅमरस चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. सोबत आशा शेलार, रॉजर डेकोस्टा यांच्याही भूमिका आहेत.

चित्रपटाची कथा–पटकथा संवाद अमोल शेटगे यांचे आहे तर सहदिग्दर्शन महेश पावस्कर याचं आहे. रुपंग आचार्य यांनी छायांकनांची तर स्वप्नील टकले यांनी कलादिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संकलन आशिष म्हात्रे व अपूर्वा यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन राजीव व सुजीतकुमार यांचं आहे. वन वे तिकीटच्या ट्रेलर व म्युझिक लाँच सोहळ्याचे प्रायोजक ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ व ‘पाँण्डस ड्रिमफ्लोवर’ हे होते.

२३ सप्टेंबरला प्रदर्शित होणारा वन वे तिकीट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण ट्रीट असणार आहे.

Marathi movies have displayed their uniqueness in all aspects. Marathi films have also consistently progressed in increasing the curiosity of cine goers, the curiosity of seeing something new. With a heady mix of glamorous superstars from the Marathi film industry, amazing locations and a different story, ONE WAY TICKET, presented by ”Video Palace” and “Makebrand”,  is very much a topic of discussion now. This movie is being widely released on the 23rd  September. producer Komal Unawane, through the movie ONE WAY TICKET,has tried to present a powerful story.

ONE WAY TICKET, a suspense thriller, is a story about the journey of five individuals on a posh cruise. One will be seeing riveting picturization of unexpected events. The story revolves around a suspense. How the story unfolds is presented in a very captivating and entertaining way by  ONE WAY TICKET‘s directors Kamal Nathani and Amol Shetge. The uniqueness of the movie is that it is totally shot on exotic locations in Italy, France and Spain. This is the first Marathi movie to be shot on a cruise.

The music of the movie, along with the movie’s variety in layout and presentation, will definitely refresh the youth. The two songs “Befikar” and “Reshmi reshmi” have received a good number of hits. The lyrics, penned by Ashwini Shende and Mandar Cholkar, have been set to music by Gaurav Dagaonkar. The background score is by Troy  Aarif. There are totally   five songs in the film. Anandi Joshi, Savani Ravindra, Rohit Raut, Shrinidhi Ghatate, Gaurav Dagaonkar, Kshitij Wag, Arunima Bhattacharya and Shifa Haris have done the vocals.

The fine amalgamation of the actors,  Sachit Patil, Amruta Khanvilkar, Gashmir Mahajani, Shashank Ketkar, Neha Mahajan Asha Shelar and Roger D’Costa, and with a riveting story,ONE WAY TICKET is definitely going to be a very entertaining treat for the spectators.

 The co-producers of this film are “Click Flick Films” and Suresh Pai. The story, script and dialogues are written by Amol Shetge, the assistant director is Mahesh Pawaskar. Director of Photography is Rupang Acharya, while the Art directior is Swapnil Takle. Editing is by Aashish Mhatre and Apurva. The Choreography is by Rajiv and Sujit Kumar.

 ONE WAY TICKET is being released on the 23rd September.

Comments are closed.