युथ – Youth

युथ – Youth

Posted by mediaone - in 2016 - Comments Off on युथ – Youth
       मराठी सिनेमा तरुण होतोय. याच प्रतिबिंब मराठी चित्रपटातही उमटू लागलं आहे. आजच्या तरूणाईचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांचे विचार केंद्रस्थानी ठेवून तरुणांभोवती विकसित होऊ पाहणारा आशय मराठी सिनेमांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे. ३ जून ला येणारा युथ सिनेमाही आजच्या तरूणाईच्या दृष्टीकोनावर भाष्य करत सध्या सर्वत्र भेडसावणारा पाणी समस्येचा ज्वलंत विषय आपल्यासमोर मांडतो.
       एखादा क्षण किंवा घटना कशाप्रकारे आयुष्य बदलू शकते हे दाखवतानाच आजची तरुण पिढीभोवतालच्या घटनांबद्दल किती संवेदनशीलपणे पहाते याचे चित्रण युथ सिनेमातून पहायला मिळणार आहे. सहा मित्रांची ही कथा आहे. केवळ मजा-मस्ती यापलिकडे फारसं जग न अनुभवलेल्या या सहा मित्रांच्या आयुष्याला एका अनपेक्षित घटनेने अचानक कलाटणी मिळते. या घटनेनंतर त्यांनी उचलेलं पाऊल काय बदल घडवणार? याची रोमांचकारी कथा म्हणजे युथ हा चित्रपट.
      व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित युथ  चित्रपटातूनही तरुणाईचा सळसळता उत्साह,उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. शिक्षणाने झालेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन युथ सिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो.
       नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले व सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका युथचित्रपटात आहेत. युथ सिनेमाचं दिग्दर्शन राकेश कुडाळकर याचं असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच सिनेमा आहे.
युथ सिनेमाचे संवाद व कथा पटकथा विशाल चव्हाण व युग यांचे आहेत. सिनेमातील गीतांनाही तरुणाईचा स्वर लाभला असून आजचे आघाडीचे गायक चिन्मय होलाळकर, गायिका शाल्मली खोलगडे, स्वानंद किरकिरे, जावेद जाफरी, अरमान मलिक यांनी गीते गायली आहेत. भारुड, रॅपसॉंग, लव्हसॉंग, युथ गीत अशी वेगवेगळ्या जॉनरची चार गाणी यात आहेत. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून कलादिग्दर्शन देवजी सकपाळ यांचं आहे. वेशभूषा भाग्यश्री, अश्विन, मिहीर यांनी केली आहे. लाईन प्रोड्युसर तुकाराम नाडकर आहेत.
       ३ जून ला युथ प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.