मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ महापरिषद संपन्न

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ महापरिषद संपन्न

Posted by mediaone - in Events - Comments Off on मान्यवरांच्या उपस्थितीत ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ महापरिषद संपन्न

विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि हिरवीगर्द वनराई लाभलेल्या कोकणाचा विकास नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यटनाच्या उद्योगातूनच होऊ शकतो, हे लक्षात घेऊन कार्यरत असणाऱ्याकोकण कॉन्क्लेव्ह ची महापरिषद नुकतीच मुंबईत संपन्न झाली. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक,  पत्रकार भारतकुमार राऊत, कालनिर्णयचे जयराज साळगावकर, आमदार अतुल भातखळकर, स्वागताध्यक्ष आमदार अमित साटम, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख, संजीव पेंढरकर, आशिष वाकणकर आदि अनेक मान्यवरांची खास उपस्थिती या परिषदेला लाभली होती.

‘कोकणाच्या विकासासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले, मात्र आपल्या इच्छाशक्तीला कृतीची जोड देत आयोजक दिनेश कानजी आणि समीर गुरव यांनी कोकण कॉन्क्लेव्हच्या माध्यामतून उचललेलं शिवधनुष्य नक्कीच कौतुकास्पद असून भविष्यातल्या कोकणाची वाटचाल नक्कीच आश्वासक असेल’, याची उत्कृष्ट झलक या महापरिषदेच्या रूपाने पहायला मिळाल्याचे गौरवोद्गार साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी याप्रसंगी काढले. आजवर नरेपार्क, शिरोडकर यांसारख्या  ठिकाणी होणारा कोकण मेळावा आता सहारा स्टार येथे संपन्न होऊ लागला असून, हे स्थित्यंतर ही आवर्जून लक्षात घेण्यासारखं असल्याचे प्रतिपादन साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी याप्रसंगी केले. व्यवसायसंधींचा स्थानिकांना उपयोग करून देण्यासाठी व्यापक प्रयत्न झाले पाहिजेत असं सांगतानाच, कोकण कॉन्क्लेव्ह’ च्या उद्देशाचे व त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक मान्यवरांनी यावेळी केले.

कोकण विकासाच्या दृष्टीने कोकण कॉन्क्लेव्ह चळवळीच्या स्वरुपात पुढे नेण्याचा मानस आयोजक दिनेश कानजी व समीर गुरव यांनी व्यक्त करतानाच या परिषदेला उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे आभार त्यांनी मानले. आघाडीचे उद्योजक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, बडे सनदी अधिकारी तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मुंबई अशा विविध ठिकाणच्या उद्योगांमध्ये स्वारस्य असलेले गुंतवणूकदार या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण दिवस चाललेल्या या परिषदेला कोकणातील मंडळीचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

कोकण कॉन्क्लेव्ह च्या आगामी उपक्रमांच्या माहितीसाठी http://KonkanConclave.com  ही लिंक पहा.

Comments are closed.