मर्डर मेस्त्री – Murder Mestri

मर्डर मेस्त्री – Murder Mestri

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on मर्डर मेस्त्री – Murder Mestri

मराठीत रहस्यमयी चित्रपट तसे फार कमीच पहायला मिळत असताना रहस्याच्या जोडीला विनोदही… ही हटके कल्पना कशी वाटते…? असाच एक धमाल विनोदाच्या सहाय्याने उत्कंठावर्धक झालेला रहस्यमयी गुंता ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी चित्रपटाद्वारा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवणारे राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

विनोदाची उत्तम जाण असलेले अनेककलाकार ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. यातल्या प्रत्येक कलाकराच्या अभिनयाची स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे. दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते या दोन मात्तबर कलाकारांसोबत हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक या नव्या दमाच्या कलाकारांची फळी या चित्रपटात पाहयला मिळणार आहे. चित्रपटातील निखळ विनोद हरवत चालला आहे. या निखळ विनोदाची अनुभती रसिक-प्रेक्षकांना ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमा देणार आहे.

‘मर्डर मेस्त्री’ हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट आहे. हे सगळेच विनोदवीर आपल्या अचूक टायमिंगने धमाल उडवून देणारे असल्यामुळे एवढी सगळी स्टारकास्ट एकाच चित्रपटात येऊन काय धमाल उडवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रहस्य लपवण्याच्या प्रयत्नात घडणाऱ्या गमती-जमतीना विनोदाची जबरदस्त फोडणी देत निर्माण होणारी गूढता हे या चित्रपटाच वेगळेपण आहे.

दिग्गज कलाकार आणि कुशल तंत्रज्ञांच्या जोडीने उत्कंठता वाढवणारा सस्पेन्स कॉमेडीचा जबरदस्त तडका ‘मर्डर मेस्त्री’ मध्ये पहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिलेत. नाडियादवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन्स आणि व्हीटीबी एन्टरप्राईझेस यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘मर्डर मेस्त्री’ हा सिनेमा निर्माते अब्रार नाडियादवाला यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमातलं सगळ्या विनोदवीरांच विनोदाचं धूमशान… हास्याचे मळे फुलवणारं असणार आहे.

रहस्याला विनोदी तडका देणारा ‘मर्डर मेस्त्री’ हा धमाल चित्रपट येत्या १० जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Jugalbandi of comedians in Marathi film ‘Murder Mestri’

While very few thriller movies are being made in Marathi, how does the novel concept of comedy along with thriller sounds? The audience will get to watch a perfect blend of hair raising suspense thriller and pure unadulterated comedy in the forthcoming Marathi film ‘Murder Mestri’. Well-known Cinematographer Rahul Jadhav has directed the film.

Many artistes who have a good understanding of comedy and also have a good comic timing have come together in the ‘Murder Mestri’. Every artist in the film has his own style of acting. Along with veterans like Dilip Prabhavalkar and Vandana Gupte, new age actors like Hrishikesh Joshi, Vikas Kadam, Sanjay Khapre, Kamlakar Satpute, Devendra Bhagat, Kranti Redkar, Manasi Naik are also working in the film. These days pure and clean comedy is vanishing from the films. But ‘Murder Mestri’ will give the audience the experience of watching pure comedy.

‘Murder Mestri’ is a suspense comedy film. Since all the actors in the film are known for their perfect timings, it will be interesting to watch how they create a laughing riot when they come together. In the many comic incidents take place when the characters tried to hide things. The perfect blend of comedy and suspense in the film that is what it makes different from other films.

Along with noted actors actresses and talented technicians, the audience will get to watch the pulse raising suspense and a strong tadka of comedy in the film. The story of the film is written by Neha Kamat and screenplays as well as the dialogues are written by Prashant Loke. ‘Murder Mestri’ which is a jointly produced by of Nadiadwala Gen-next Production and VTB Productions. This is a debut venture of producer Abrar Nadidwala. The laughing riot created by the actors will surely made the audience laugh till they drop.

‘Murder Mestri’ which gives seasons a thriller with large doses of comedy is slated to be release on July 10th.

प्रयोगशील दिग्दर्शक राहुल जाधव

चांगले कॅमेरामन पुढे दिग्दर्शक होतातच हा चित्रपटसृष्टीचा नियम आहे. या नियमाला अनुसरून कॅमेरामन राहुल जाधव यांनी अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमा केले आहेत. आता ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी सिनेमात त्यांनी असाच हटके विषय हाताळला आहे. राहुल जाधव हे वेगळ्या जातकुळीतले कॅमेरामन आहेत. त्यांचा कॅमेरा बरंच बोलून जातो. टीव्ही मालिकांमध्ये टिपरे व जस्सी जैसी कोई नही सारख्या लोकप्रिय मालिकांच व अगं बाई अरेच्चा, शुगर सॅाल्ट आणि प्रेम, साटं लोटं, नारबाची वाडी, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा, झेंडा, मोरया चित्रपटांच छायांकन त्यांनी केलं आहे. विजय असो, हॅलो नंदन चित्रपटाचं दिग्दर्शन व झेंडा, मोरया, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा याचं सहदिग्दर्शनही त्यांनीच केलं होत.

आज जे काही हाताच्या बोटावर नावाजलेले कॅमेरामन सिनेसृष्टीत आहेत त्यापैकी एक म्हणजे राहुल जाधव. मराठी सिनेमामध्ये वेगळे प्रयत्न होताना दिसत आहेत. कॅमेरामन राहुल जाधव यांनी त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हा वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मर्डर मेस्त्री’ या सिनेमातही नवकल्पनांचा हाच अविष्कार पाहता येणार आहे.

काही ना काही नवीन करण्याच्या ऊर्मीतून राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाच्या निमित्ताने सस्पेस्न्स कॉमेडीचा प्लॉट दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाचं हाताळला असल्याचं राहुल जाधव सांगतात. अभिनेता दिलीप प्रभावळकर व गायिका आशा भोसले या दोन दिग्गजांबरोबर काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव खूप काही शिकवणारा होता असं सांगत, या दोन दिग्गज व्यक्तिमतवांसोबत काम करण्याचं स्वप्न ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाने पूर्ण केलं. याचं एक वेगळचं समाधान  त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. ‘मर्डर मेस्त्री’ या सिनेमाच्या वेगळेपणाबद्दल बोलताना ते सांगतात की, आजवर चित्रपटात बायकांच्या संशयावरून उडणारा गोंधळ दाखवला गेला आहे. ‘मर्डर मेस्त्री’ मध्ये पुरुषांच्या संशयावरून उडणारा गोंधळ पाहता येणार आहे. ही भन्नाट कल्पना एक्झिक्युट करताना मजा केल्याचं राहुल जाधव सांगतात.

पोस्टमन हृषिकेश जोशी

हृषिकेश जोशी म्हणजे चोखंदळ अभिनेता. सिनेमाच्या कथा पटकथेचा बारकाईने अभ्यास करून मगच सिनेमा निवडणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख. त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा आपण आतापर्यंत अनेक चित्रपटातून पहिल्या आहेत. ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी सिनेमात ते पोस्टमनची भूमिका साकारणार आहेत.

चित्रपट असो वा नाटक-मालिका त्यातील व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी कलावंताला जिवाचं रान करावं लागतं. ती व्यक्तिरेखा कधी कलावंताने बघितलेली नसते. कधी संबंधही आलेला नसतो, पण ती जिवंत करायची असते. आपल्या वाटयाला आलेल्या प्रत्येक भूमिकेचं हृषिकेश जोशी यांनी सोनं केलं आहे.’ ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी चित्रपटात हृषिकेश जोशी यांच्या वाटयाला अशीच एक हटके भूमिका आली आहे. यात हृषिकेश जोशी ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार नाहीय. या चित्रपटात चक्क पोस्टमनच्या लूकमध्ये ते दिसणार आहेत. विनोदाच्या अचूक टायमिंगने हृषिकेश जोशी यांनी पोस्टमनच्या भूमिकेत चांगलीच रंगत आणली आहे. हृषिकेश जोशी यांनी चित्रपटांतील आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहे, त्यामुळेच ‘मर्डर मेस्त्री’ मधल्या त्यांच्या भूमिकेची उत्सुकता लागली आहे.

मर्डर मेस्त्रीसिनेमाच्या गीतात एल्फी-सेल्फी अॅप

प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नेहमीचचित्रपटाचं स्वरूप बदलत असतं. त्याला अनुसरून चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकही निरनिराळ्या क्लुप्त्या लढवतअसतात. अशीच एक भन्नाट कल्पना दिग्दर्शक राहुल जाधव यांनी ‘मर्डर मेस्त्री’ या आपल्या चित्रपटातील ‘जीवाला लागला घोर’ या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आणली आहे.

जमाना सेल्फीचा आहे, मराठी चित्रपटसृष्टी त्यात मागे कशी राहील..? ‘मर्डर मेस्त्री’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एल्फी सेल्फी’ या अॅपद्वारे बनवण्यात आलेले ‘जीवाला लागला घोर’ हे गाणं दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, ऋषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, क्रांती रेडकर आणि मानसी नाईक यांवर चित्रित नाही तर एडीट करण्यात आले आहे. ‘एल्फी सेल्फी’ या अॅपमध्ये असलेल्या व्हिडीओज् वर चित्रपटातील कलाकारांच्या सेल्फी लावण्याची शक्कल सृती सुकुमारन हिने लढवली असून हे धम्माल गाणं म्हणजे प्रेक्षकांसाठी व्हिज्युअल ट्रिट आहे.

संगीतकार पंकज पडघन यांनी पहिल्यांदाचकल्ट फोल्क सॉंग पॅटर्न हा ‘मर्डर मेस्त्री’ चित्रपटाद्वारे मराठीत आणला आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स यागाण्याने होत असल्याने त्यातले रहस्य जपत हे गाणं प्रेक्षकांना ऐकता यावं पाहता यावं याकरिता ही ग्राफिक ट्रीटमेंट ‘जीवाला लागला घोर’ गाण्याला दिली गेली असल्याचे दिग्दर्शक राहुल जाधव यांनी सांगितलं. गुरु ठाकूर यांचे गमतीशीर शब्द आणि आदर्श शिंदे यांचा मस्तीभरा आवाज लाभलेल्या या गाण्यात दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते साल्सा करताना दिसतील तर इतरही कलाकारांचा मजेशीर अवतार तुम्ही या गाण्यात पाहू शकाल.

Comments are closed.