मराठी सिनेमाला मल्याळम टच

मराठी सिनेमाला मल्याळम टच

Posted by mediaone - in News - Comments Off on मराठी सिनेमाला मल्याळम टच

मराठी चित्रपटांचा ट्रेंड सध्या बदलतोय. मराठी सिनेमांमधली वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकंचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे, बॉलीवूड मधल्या नामवंत कलाकारांनाही मराठी चित्रपट सृष्टीने कायमच खुणावलं. पण आता तेवढ्यावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव, एक मोठा बॅनर मराठीत पदार्पण करतोय. विझार्ड प्रोडक्शन च्या माध्यमातून सिजो रॉकी हे “प्रीतम”  हा मराठी सिनेमा घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक नव्या धाटणीची प्रेमकथा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे.

सिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन यांचा मल्याळम इंडस्ट्री मध्ये दबदबा आहेच, पण त्याचसोबत जाहिरात क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. इंडिगो पी.यु. एनेमल, प्रेस्टीज, रोटा व्हायरस, उजाला, मर्सिडीज इ, मर्सिडीज बेंझ, मेडीमिक्स या नामवंत ब्रँडसाठी जाहिराती ही केल्या आहेत.

विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत “प्रीतम” या चित्रपटाचं दिग्दर्शन ही सिजो रॉकी करत आहेत. या निमित्ताने ते पहिल्यांदा मराठीत पदार्पण करत आहेत. “मराठी चित्रपट हा आशय संपन्न असतो, या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय याचा आम्हाला आनंद आहे” असे सिजो रॉकी यांनी सांगितले. चित्रपटाची निर्मिती फैझल निथिन सिजो करत आहेत.

चित्रपटाचे संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांची असून, चित्रपटातील गीतं गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन संदीप रावडे करणार असून संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाशतर संगीत विश्वजीथ यांचे आहे. चित्रपटाच सहदिग्दर्शन जयकुमार नायर आणि रफिक टी.एम. यांचे असणार आहे. गणेश दिवेकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत आणि सिजो रॉकी  दिग्दर्शित“प्रीतम” या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Comments are closed.