भो भो – Bho Bho

भो भो – Bho Bho

Posted by mediaone - in 2016 - Comments Off on भो भो – Bho Bho

अलीकडच्या मराठीतील नावीन्यपूर्ण विषयांवरच्या सिनेमांच्या पठडीतला आणि शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित करणारा भो भो हा मराठी सिनेमा येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. दमदार कथानक, कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी व दिग्दर्शनाच्या अनोख्या अंदाजातला भो भो प्रेक्षकांसाठी एक वेगळीच ट्रीट असणार आहे.

भो भो या सिनेमाचं कथानक एका कुत्र्याभोवती गुंफलं आहे. माणसांशी इमान राखणारा त्याच्याशी प्रामाणिक राहणारा कुत्रा कधी विश्वासघात करू शकतो का? सॅण्डी नावाच्या एका पाळीव कुत्र्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या मालकिणीवर हल्ला करून तिला ठार केलंय. आता ते सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांवर आणि खासगी गुप्तहेर व्यंकटेश भोंडे यांच्यावर पडली आहे. हा व्यंकटेश भोंडे हा शोध पूर्ण करतो का? सॅण्डी खरंच दोषी आहे का? या सर्वांची उत्तरं भो भो चित्रपटात पहायला मिळणार आहेत. अतिशय थरारक आणि नाट्यपूर्ण घटनांतून हा सर्व प्रवास भो भो चित्रपटातून आपल्यासमोर मांडण्यात आला आहे.

या सिनेमात प्रशांत दामले यांनी व्यंकटेश भोंडे ही खासगी गुप्तहेराची भूमिका वेगळ्या ढंगात साकारली आहे. या चित्रपटाचं बहुतांशी चित्रीकरण हे रीअल लोकेशनवर चित्रित करण्यात आलं आहे. चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल अशी अपेक्षा दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी व्यक्त केली.

चित्रपटाची कथा भरत गायकवाड यांची असून पटकथा भरत गायकवाड जयंता बोर्डोलोय यांची आहे. संवाद  मकरंद सखाराम सावंत, जयदीप लेले, भरत गायकवाड यांनी लिहिले आहेत. छायचित्रण अनिल चंदेल यांचं असून संकलन मुकेश तिमोरी यांचं आहे. गीतकार अंबरीश देशपांडेयांच्या गीतांना गायक गुलराज सिंग यांनी स्वरबद्ध केलं आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पार्थ भरत ठक्कर यांनी सांभाळली आहे.रंगभूषा मुकेश झाला यांची असून वेशभूषा उत्कर्षा दिघे यांनी केली आहे.

‘सुमुखेश फिल्म्स’ प्रस्तुत आणि भरत गायकवाड निर्मित-दिग्दर्शित भो भो  या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात प्रशांत दामले यांच्यासोबत सुबोध भावे, संजय मोने, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, सौरभ गोखले, अनुजा साठे, किशोर चौगुले, राजन भिसे, शैलेश दातार, उदय नेने, प्रमोद पवार, समीर विजयन, केतकी चितळे, माधव अभ्यंकर, वंदना वाकनीस, प्रदीप पटवर्धन अशी तगडी स्टारकास्ट आहे.

भो भो  चित्रपट २२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

Comments are closed.