भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर रोखठोक सुप्रिया सुळे

भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर रोखठोक सुप्रिया सुळे

Posted by mediaone - in Events - Comments Off on भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर रोखठोक सुप्रिया सुळे

राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुरब्बी राजकारणी शरद पवार यांच्या कन्या. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रिया सुळे यांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला. समाजकारण आणि राजकारण यांची उत्तम सांगड घालत महिला सक्षमीकरणासाठी चांगले उपक्रम देत अनेक महिलांना आर्थिक स्वालंबन देण्याच्या त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कुपोषणाबाबतही सुप्रिया सुळेंनी भरीव काम केलं आहे.

वेगवेगळे सामाजिक विषय हाताळत लोकांपर्यंत पोहचणाऱ्या सुप्रिया सुळेंची संसदेतही लक्षणीय कामगिरी राहिली आहे. वेगवेगळ्या प्रश्नांसाठी कायमच रोखठोक भूमिका घेणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविलेल्या सुप्रियाजी यांचा  राजकारण व समाजकारण विषयीचा नेमका दृष्टीकोन कसा आहे हे जाणून घेण्याची संधी लवकरच पुणेकरांना मिळणार आहे.

‘लोकमंच’ या उपक्रमांतर्गत तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातल्या संवादाचा दुवा साधण्याचं काम करणाऱ्या   भाडिपाच्या ‘विषय खोल’  या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या जनतेच्या भेटीला येणार आहेत. भाडिपा‘लोकमंच’ च्या माध्यमातून विविध विषयांवरील रोखठोक मते सुप्रियाजी व्यक्त करणार आहेत. शनिवार २३ फेब्रुवारीला दुपारी १२.०० वा कल्चरल सेंटर सिंहगड इन्स्टिट्यूट वडगाव येथे हा चर्चात्मक कार्यक्रम होणार आहे.

Comments are closed.