भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार

भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार

Posted by mediaone - in Events - Comments Off on भाडिपाच्या ‘लोकमंचा’वर खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार

लोकमंच या उपक्रमांतर्गत तरुण मतदार आणि राजकारणी यांच्यातल्या संवादाचा दुवा साधण्याचं काम करणाऱ्या   भाडिपाने ‘विषय खोल’  या नव्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्यांना बोलतं करण्याचं ठरवलं आहे. नागपूरात या उपक्रमाचे ‘पहिले पुष्प’ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुंफले. नागपूरात रंगलेल्या या सत्रानंतर या उपक्रमाचे दुसरे पाहुणे कोण असणार ? याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. ही उत्सुकता आता लवकरच संपणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक आंदोलनाद्वारे हाताळत ‘शिवार’ ते ‘संसद’ असा राजकीय प्रवास करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी या उपक्रमाअंर्तगत कोल्हापूरमध्ये जनतेच्या भेटीला येणार आहेत.

रविवार १० फेब्रुवारीला कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये दुपारी २.०० वा. खासदार राजू शेट्टी यांच्याशी सवांद साधता येणार आहे. अभिनेता पुष्कराज  चिरपुटकर हा खासदा राजू शेट्टी यांची मुलाखत घेणार आहे.जनतेच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरे देत वैचारिक मंथनाने वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाईल हे नक्की. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर खास तरुण मतदारांसाठी सुरु करण्यात आलेला हा कार्यक्रम सर्वांसाठीच विनामूल्य आहे.

Comments are closed.