भय – BHAY

Posted by mediaone - in Upcoming - Comments Off on भय – BHAY

कॅमेऱ्याचा लखलखाट, तारे-तारकांची झगमग अशा बहारदार वातावरणात ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या आगामी मराठी सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या सिनेमाचं म्युझिक लाँच बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडन व अभिनेता सोहेल खान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या संगीत अनावरण सोहळ्यात असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या ट्रेलरची व गीतांची झलक दाखवण्यात आली. मराठी चित्रपटांची यशस्वी घौडदौड प्रशंसनीय असून भय हा सिनेमा प्रेक्षकांना निश्चितच वेगळा अनुभव देईल, असा विश्वास अभिनेत्री रविना टंडन व सोहेल खान यांनी यावेळी व्यक्त केला.

भय चित्रपटातील सर्व कलाकारांचे कौतुक करताना मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा रवीना टंडन यांनी यावेळी बोलून दाखवली. तामिळ, तेलगु व अरेबिक या तीन भाषांमध्ये भय हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार असून याची घोषणासुद्धा याप्रसंगी करण्यात आली. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.

या चित्रपटात तीन वेगळ्या जॉनरची गाणी आहेत. ‘साजणा’, ‘मी आलो’, या दोन गीतांना ब्रिजेश शांडिल्य व तुलिका उपाध्याय यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. ही दोन्ही गाणी  हटक्या पद्धतीने शूट केली गेली असून विशेष म्हणजे क्रुझ, हेलिपॅडवरील दृश्ये आणि दुबईतील गगनचुंबी इमारती तसेच प्रसिद्ध बीचेसची अनोखी सफर या गाण्यांद्वारे घडते. तर ‘चल रे’ हे गीत अली असलम यांनी स्वरबद्ध केलं आहे. शेखर अस्तित्व यांच्या गीतांना विक्रम माँटरोज यांचा संगीतसाज आहे. भय चित्रपटाची ध्वनीफित ‘झी म्युझिक’ने प्रकाशित केली आहे.

अभिजीत खांडकेकर, सतीश राजवाडे, उदय टिकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते. ही भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंतवून टाकणारा प्रवास भय चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. कथा पटकथा संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफर राजेश राठोर आहेत.

English Note –

Grand Music Launch of BHAY

Amidst flashing cameras, glittering stars and an exhilarating atmosphere, the music of 5G International presents and Sachin Katarnawre produced, BHAY, was launched. The music was launched by Bollywood stars Raveena Tandon and Sohail Khan. The music was launched with great enthusiasm in the prescence of numerous celebrities. On this occasion, the Trailer of the movie and songs were screened. Actors Raveena Tandon and Sohail Khan said that the successful run of Marathi films is praiseworthy, and the movie BHAY will definitely be a new experience for the movie goers.

Praising all the actors of the movie BHAY, Raveena Tandon expressed her wish to act in Marathi films. At the launch, it was also announced that the movie will also be released in three languages, Tamil, Telugu and Arabic. Rahul Bhathankar has done the direction and editing.

This movie has songs of three different genres. The two songs, “Saajanaa” and “Mi aalo” have been sung by Brijesh Shandilya and Tulika Upadhyay. Both the songs have been picturized in a different style. The songs take us on a small journey on a cruise, and we are treated to beautiful visuals of helipads and skyscrapers of Dubai and pristine and famous beaches. The song “Chal re” has vocals by Ali Aslam. The lyrics by Shekhar Astitva have been set to music by Vikram Montrose. The Music of BHAY is Released  by  Zee Music.

Abhijit Khandkekar, Satish Rajwade, Uday Tikekar, Smita Gondkar, Sanskruti Balgude, Vinit Sharma, Siddharth Bodke, Shekhar Shukla, Dhananjay Mandrekar, Nupur Dudhwadkar have acted in this film. Each one has some fear in their mind. How people living with fear in their mind,  face various difficulties, is what we are going to see in this absorbing movie BHAY. The co-producers of the movie are Ajay Joshi. Ashish Chauhan is the executive producer. Story, screenplay and dialogues are by Nitin Vijay Supekar. Art direction is by Prashant Rane. Ajay Devrukhkar is the choreographer and the cinematographer is Rajesh Rathore.

Comments are closed.