‘प्राइम टाईम’ – Prime Time

‘प्राइम टाईम’ – Prime Time

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on ‘प्राइम टाईम’ – Prime Time

टीव्हीने आपल्या सर्वांच्या आयुष्यावर केव्हाच ताबा मिळवला आहे. इडियट बॉक्स असं नाव पडलेला  टीव्ही आज प्रत्येक घरातला अविभाज्य घटक झाला आहे. टीव्ही मालिकांचा सर्वाधिक मोठा प्रेक्षकवर्ग आहे तो महिलावर्ग. मालिकांचा महिलांवर असलेला पगडा लक्षात घेत सर्व चॅनल्स सिनेमे, मालिका, कुकिंग शो, रिअॅलिटी शो, स्पोर्टस अशा अनेक गोष्टींचा सतत रतीब घालत असतात. याच पार्श्वभूमीवर निर्माते हिमांशू पाटील व  दिग्दर्शक प्रमोद कश्यप ‘प्राइम टाईम’ हा आगामी मराठी सिनेमा घेऊन आले आहेत.

या इडियट बॉक्स’ मुळे एका कुटुंबातल्या नात्यांची वीण कशी तुटते हे ‘प्राइम टाइम’ सिनेमात  पाहायला मिळेल. वैशाली आपटे या मध्यमवर्गीय गृहिणीची ही कथा आहे. तिच्या टेलिव्हिजनच्या वेडामुळे कुटुंबातल्या सर्वांना  होणारा मनस्ताप रंजक पद्धतीने यात मांडला आहे. प्रत्येक घरातलं प्रातिनिधिक चित्र या चित्रपटातून दाखवतानाच नात्यांचा आपलेपणा ही अधोरेखित करण्यात आला आहे.

चित्रपटाचे छायांकन सुमीत सूर्यवंशी यांनी केले असून, संकलन श्रीकांत केळकर यांचं आहे. चित्रपटाला  साजेशी अशी गीते प्रशांत जामदार यांनी लिहिली असून निरंजन पेडगांवकर यांनी संगीत दिलं आहे. तर श्रेया घोषाल, सावनी रविंद्र, जान्हवी प्रभू अरोरा, रोहित राऊत, निरंजन पेडगांवकर, ओमकार पाटील यांच्या आवाजाचा परीसस्पर्श या गीतांना लाभला आहे. ‘आली लहर आणि केला कहर’, ‘रेशमी’, ‘पावसात’, ‘जिंदगी’, ’तुझ्याविना’ अशी गीते यात आहेत.

सारानय एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेला हा हलका फुलका विनोदी चित्रपट येत्या २९ मे ला सर्वत्र  प्रदर्शित होतोय. सुलेखा तळवलकर, मिलिंद शिंत्रे, निशा परुळेकर, किशोर प्रधान, अनुराग वरळीकर, कृतिका देव, स्वयंम जाधव या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

Comments are closed.