पोलिस लाईन – Police Line

पोलिस लाईन – Police Line

Posted by mediaone - in 2016 - Comments Off on पोलिस लाईन – Police Line

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. समाजाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटकाची कथा आता मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातली आहे. नाण्याला नेहमी दोन बाजू असतात पण कित्येकदा त्यातल्या एकाच बाजूचा विचार केला जातो. दुसरी बाजू तशीच अंधारात राहाते. या अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकण्याचं काम दिग्दर्शक राजू पार्सेकर यांनी आपल्या आगामी ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य याचित्रपटातून केलं आहे.साईश्री क्रिएशन प्रस्तुत जिजाऊ क्रिएशन निर्मित ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या मराठी चित्रपटातून पोलिसांची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे.

सामन्यांच्या सेवेलाकायम तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वतःच्या ही काही गरजा आहेत. अहोरात्र सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलिसांच्या या गरजांचा विचार व्हावा यासाठी ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती जिजाऊ क्रिएशनतर्फे करण्यात आली. रंजनातून अंजनाची जाणीव करून देणारा हा सिनेमा ५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सतत ‘ऑन ड्यूटी’ असल्याने ढासळते आरोग्य, तणाव, निवासस्थानाची दुर्दशा, तुटपुंजा पगार अशा अनेक समस्यांमुळे पोलिस त्रस्त आहेत. पोलिसांना भेडसवणाऱ्या याच समस्यांवर ‘पोलिस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. पोलिस ही माणूस आहे हे सर्वानी लक्षात घ्यायला हवं. पोलिस लाईन एक पूर्ण सत्य  हा चित्रपट पोलिसांच्या वेदनेची जाणीव करून देईल.

श्रीधर चारी, भारती शेट्टी व निक्षाबेन मोदी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. रुपाली पवार व वैशाली पवार या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा दिपक पवार यांची असून पटकथा, संवाद अमर पारखे, राजू पार्सेकर, संदेश लोकेगांवकर यांचे आहेत. दिग्दर्शन राजू पार्सेकर यांचे आहे. चित्रपटातील गीते कौतुक शिरोडकर, नितीन तेंडुलकर यांनी शब्दबद्ध केली असून प्रविण कुवर, अभिषेक शिंदे यांचा संगीतसाज गीतांना लाभला आहे. आदर्श शिंदे, भारती मढवी, प्रविण कुवर यांनी ही गीते स्वरबद्ध केलीअसून प्रविण कुवर, ओंकार टिकले यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. “सदरक्षणाय खलनिग्रणाय” आणि “आख्खा शिनेमा पाहून घे’’ ही दोन गीते या चित्रपटात आहेत. नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांच आहे. सतीश पाटील यांनी संकलनाची व निलेश ढमाले यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.

जयंत सावरकर, सतीश पुळेकर, प्रदीप पटवर्धन, विजय कदम, प्रदीप कब्रे, प्रमोद पवार, जयवंत वाडकर, संतोष जुवेकर, निशा परुळेकर, पुर्णिमा अहिरे-केंड, नूतन जयंत, प्रणव रावराणे, सतीश सलागरे, जयवंत पाटेकर, स्वप्नील राजशेखर, शर्मिला बाविस्कर, मनोज टाकणे, बालकृष्ण शिंदे, अतुल सणस, रियाज मुलाणी, संदेश लोकेगांवकर, शितल कलापुरे, अश्विनी सुरपूर, लिना पालेकर, आरती कुलकर्णी, दिनेश मोरे, उमेश बोळके, पार्थ घोरपडे, युवराज मोरे, नवतारका सायली संजीव, मानसी नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत ५ फेब्रुवारीला पोलिस लाईनएक पूर्ण सत्य हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

प्रस्तुत             :-   साईश्री क्रिएशन

निर्मित             :-   जिजाऊ क्रिएशन

प्रस्तुतकर्ते          :-   श्रीधर चारी, भारती शेट्टी व निक्षाबेन मोदी

निर्मात्या           :-   रुपाली पवार , वैशाली पवार

दिग्दर्शक           :-  राजू पार्सेकर

संकलन            :-  सतीश पाटील

छायांकन           :-  निलेश ढमाले

कथा              :-  दिपक पवार

पटकथा – संवाद     :-  अमर पारखे, राजू पार्सेकर , संदेश लोकेगांवकर

गीते              :-  कौतुक शिरोडकर, नितीन तेंडुलकर

संगीतकार          :-  प्रविण कुवर, अभिषेक शिंदे

पार्श्वसंगीत          :-  प्रविण कुवर, ओंकार टिकले

पार्श्वगायक          :-  आदर्श शिंदे , भारती मढवी, प्रविण कुवर

नृत्य              :-  संतोष पालवणकर

 

कलाकार

१)   जयंत सावरकर :- शिंदे काका

२)   सतीश पुळेकर :- सावंत अप्पा

३)   विजय कदम   :- हवालदार रमेश भोसले

४)   प्रदीप कब्रे   :- पोलीस हवालदार परब मामा

५)   प्रमोद पवार   :- पोलीस शिपाई मनोहर पवार

६)   जयवंत वाडकर  :- पोलीस हवालदार भिमा कांबळे

७)   संतोष जुवेकर   :- बाळा

८)   सायली संजीव   :- दिव्या

९)   निशा परुळेकर   :- उज्वला

१०)  सतीश सलागरे   :- पोलीस शिपाई सावंत

११)  स्वप्नील राजशेखर   :- सुनील

१२)  जयवंत पाटेकर    :- खान चाचा

१३)  मानसी नाईक

Comments are closed.