नागपूर अधिवेशन – Nagpur Adhiveshan

नागपूर अधिवेशन – Nagpur Adhiveshan

Posted by mediaone - in 2016 - Comments Off on नागपूर अधिवेशन – Nagpur Adhiveshan

दरवर्षी भरणारे नागपूर अधिवेशन एक सरकारी सहलच झाली आहे. या काळात एक वेगळेच नागपूर विधानभवनाबाहेर पाहायला मिळते. राज्याचे विषय, त्यांच्या समस्या घेऊन तिकडे विधानसभेत अथवा विधान परिषदेत बोलणारी राजकारणी मंडळी, त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते, मोर्चे घेऊन येणारी मंडळी, अनेक आमदार- कार्यकर्ते मंडळी यांची स्वतःची स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरु असते. यावेळी घडणाऱ्या गमतीजमती एरवी कुठेच पाहायला मिळत नाहीत. ऐन थंडीतअधिवेशनाला जाण्याचा नेते मंडळींचा उत्साह व पिकनिक मूडमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करण्याची प्रवृत्ती जास्तच बळावत चालली आहे. याचेच मार्मिक चित्रण अनिल केशवराव जळमकर निर्मित ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ या मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. निलेश रावसाहेब जळमकर लिखित- दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला प्रदर्शित होतोय.

विदर्भ पिक्चर्स प्रस्तुत, ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ चित्रपटातून या अधिवेशनाची एक वेगळी बाजू मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. राजकारणापलीकडचे राजकीय रंग या हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळतात. अधिवेशनादरम्यान रंगणारा गप्पांचा राजकीय फड असो की राजकारण्यांची स्टाईल हे सगळंच या काळात खूप लक्षवेधी असतं. मंत्र्यांच्या सरबराईत इथला सरकारी कर्मचारी कसा त्रासून जातो आणि शेवटी करोडो रुपये खर्च करून पार पडणाऱ्या अधिवेशनात अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. अशा अनेक बाबींवर या चित्रपटातून नेमकं भाष्य करण्यात आलंय. या चित्रपटाची सह-निर्मिती ययाति नाईक यांनी केली आहे.

मकरंद अनासपुरे, अजिंक्य देव, मोहन जोशी, भारत गणेशपुरे या कलाकारांसह विनीत भोंडे, चेतन दळवी, अमोल ताले, संकर्षण कऱ्हाडे, दिपाली जगताप, स्नेहा चव्हाण आदी कलाकारांनी अफलातून भूमिका साकारल्या आहेत. गीतकार अनंत खेळकर, निलेश रावसाहेब जळमकर, अमोल ताले लिखित गीतांना अमित ताले यांनी संगीतबद्ध केलं आहे. पार्श्वसंगीताची साथ अमेय नारे, साजन पटेल यांनी दिली असून प्रसन्नजीत कोसंबी, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे, शरद ताऊर यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. वेशभूषा संदीप जोशी, रंगभूषा निशिकांत उजवणे यांची तर छायांकन चंद्रकांत मेहेर यांनी केलंय. कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी योगेश जाधव यांनी सांभाळली आहे.

 ‘नागपूर अधिवेशन एक सहल..’ ९ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

 

NAGPUR ADHIVESHAN on the 9th of December

Nagpur has the status of the second capital of the state of Maharashtra, hence every year the winter session of the legislative assembly is held in Nagpur. During the entire duration of the session, a different Nagpur can be seen outside the Vidhan Bhavan. Matters of the state, and its various problems are spoken about by the politicians in the Vidhan Sabha or the Vidhan Parishad. Because of the various politicians , we have party workers from different parties, we have agitating people. Many legislative members and their party workers are busy forming new fronts. Funny incidences and events which happen during this period cannot be seen anywhere else. We get to see leaders who come here year after year and behave as if it is a continuation from the previous page. There is an excitement amongst the leaders in attending the sessions in the middle of winter, being in a picnic mood they do not bother with the problems faced by the people, this behaviour is getting stronger in recent years. This has been picturised in a   very riveting and thought provoking manner in  Anil Keshavrao Jalamkar produced ‘Nagpur Adhiveshan Ek Sahal’. This movie written and directed by Nilesh Raosaheb Jalamkar, is being released in theatres on the 9th of December.

In this Vidharbha Pictures presentation ‘Nagpur Adhiveshan Ek Sahal’, the director has tried to present a different perspective of the winter session. A political colour beyond politics can be seen in this winter session. The colourful gossips during the session and the styles of politician is very eye-catching.  In pandering to the whims of the ministers, the local government employees are totally harried and finally after spending crores of rupees on this session many problems still remain unsolved. Many incidences like this have been commented upon in this movie. The movie is co-produced by Yayati Naik.

Along with leading actors like Makarand Anaspure, Ajinkya Dev, Mohan Joshi, Bharat Ganeshpure,  Vineet Bhonde, Chetan Dalvi, Amol Tale, Sankarshan Karhade, Dipali Jagtap, Sneha Chavan have given stellar performances. Lyrics written by Anant Kelkar,Nilesh Raosaheb Jalamkar and Amol Tale have been set to music by Amit Tale. Background music is by Amey Naare and Saajan Patel and the songs are recorded in the voices of Prasanjit Kosambi, Bela Shende, Hrishikesh Ranade and Sharad Tawoor. Costumes are by Sandeep Joshi, make-up by Nishikant Ujavane and photography is by Chandrakant Meher. The executive producer is Yogesh Jadhav.

Releasing on the 9th of December ‘Nagpur Adhiveshan Ek Sahal’ will definitely make the viewers to contemplate.

 

Comments are closed.