तरूणाईचा ‘युथट्यूब’ १ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

तरूणाईचा ‘युथट्यूब’ १ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

Posted by mediaone - in News - Comments Off on तरूणाईचा ‘युथट्यूब’ १ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

मराठी सिनेमा तरुण होतोय. याच प्रतिबिंब मराठी चित्रपटातही उमटू लागलं आहे. मराठी सिनेमांमध्ये तरुणांभोवती विकसित होऊ पाहणारा आशय अधिक प्रकर्षाने दिसू लागला आहे. कॉलेजचे दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यातले मंतरलेले दिवस… तरुणाईच्या सळसळता उत्साह, जल्लोष, धम्माल अनुभवण्याचे ते दिवस प्रत्येकाच्याच स्मृतीत कायमच रंजी घालत असतात. कॉलेजची हीच धमाल मस्ती दाखवताना सोशल माध्यमाच्या अतिरेकावर भाष्य करणारा युथट्यूब हा चित्रपट १ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रमोद प्रभुलकर यांनी सांभाळली आहे.

सोशल मीडिया हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक प्लॅटफॉर्म असला तरी तो कसा वापरला पाहिजे याचं भान हल्ली कुठेतरी निसटतं आहे. हाच धागा पकडून एका कॉलेजच्या ग्रुपची कथा यात पहायला मिळणार आहे. कित्येकदा अचानक काही अफवा सोशल माध्यमावर येतात. त्यावर शेकडोंच्या संख्येने प्रतिक्रियाही येतात कोणतीही पूर्ण माहिती नसताना त्यावर प्रतिक्रिया उत्तर देणं, ही जणू आजच्या पिढीचं व्यसन झालं आहे. त्यामुळे अनेकजण चुकीच्या पाशात अडकले जातात. जेवढा सोशल मीडीयाचा उपयोग चांगल्या कामासाठी होतोय, तेवढाच किंवा त्याहूनही खूप जास्त गैरवापर वाढतोय. या दोन्ही गोष्टींचा उहापोह करताना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन युथट्यूब चित्रपट ठळकपणे अधोरेखित करतो.

युथट्यूब या चित्रपटात ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अॅकडमी’तील ३०० विद्यार्थी झळकणार आहेत. एकाच अॅक्टिंग अॅकडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे. शिवानी बावकर, पूर्णिमा डे, शर्वरी गायकवाड, मृण्मयी कुलकर्णी, सिद्धांत धोत्रे, विनयरावल रतीश आरोलकर अनिकेत वाघ आदि कलाकारांसोबत मधुराणी प्रभुलकर यात पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे.

युथट्यूब या चित्रपटाची सहनिर्मिती मयुरपंख मिडिया आणि इन्फ्रा असोसिएटस् (संजीव पेठकर, डॉ. शशांक भालकर), अविनाश कुलकर्णी, रजनी प्रभुमिराशी, डॉ.फाल्गुनी जपे, अरुणा जपे, सुधीर कुन्नुरे, प्रशांत लाल, अहमद शेख, स्वाती येवले, गिरीश नायर, वैशाली कासारे, अनिकेत कुलकर्णी,  विवेक बावधाने, डॉ.संदीप कुलकर्णी, सागर पुजारी, वैशाली देवकर, सुखद बोरकर,सोनाली लोणकर, श्रीहरी पंचवाडकर आणि मेसर्स बी.एन.आर तर्फे भालचंद्र बोबडे, प्रवीण नेवे, गजानन रहाटे यांची आहे.

छायांकन सचिन गंडाकुश तर संकलन प्रमोद काहार यांचे आहे. कलादिग्दर्शन संजय कांदेकर यांनी केले आहे. रंगभूषा सौरभ कापडे यांची तर वेशभूषा मधुराणी प्रभुलकर यांची आहे. संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकर, सायली केदार, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज, शिखा जैन, आर्या आंबेकर,सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे.

१ फेब्रुवारीला ‘युथट्यूब प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.