TRUCKBHAR SWAPNA – (ट्रकभर स्वप्नं)

TRUCKBHAR SWAPNA – (ट्रकभर स्वप्नं)

Posted by mediaone - in 2018, News - Comments Off on TRUCKBHAR SWAPNA – (ट्रकभर स्वप्नं)

मुंबईत आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक जण त्यासाठी दिवसरात्र झटत असतात.  ‘एक घर हो सपनों का’ पण स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकठीण काम… प्रत्येकाच्या मनात लपलेली ही इच्छा कधी पूर्ण होते तर कधी स्वप्नांच्या हिंदोळ्यावरून परतून जाते. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका मध्यमवर्गीय कुटुंबाने  केलेली धडपड दाखविणारा  ट्रकभर स्वप्नं हा  चित्रपट २४ ऑगस्टला आपल्या भेटीला येणार आहे. आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा. लि व आदित्य चित्र प्रा.लि यांची प्रस्तुती असलेल्या या  चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद पवार यांचे आहे.

एका चौकोनी कुटुंबाची आणि त्यांच्या स्वप्नांची कथा दाखवताना ट्रकभर स्वप्नं या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब यात प्रत्येकाला पहायला मिळेल.

मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मकरंदने यांनी या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे तर क्रांतीने मकरंदच्या पत्नीच्या भूमिकेत रंग भरले आहेत. या दोघांसोबत मुकेश ऋषी, मनोज जोशी स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगरे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या भूमिका यात आहेत

वेगवेगळ्या पठडीतली ४ गाणी ट्रकभर स्वप्नं या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘लुकलुकले स्वप्न’ हे प्रेमगीत, ‘सेल्फीवाली’ हे आयटम सॉंग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारे ‘धडक धडक’ गाणं आणि ‘देवा तुझ्या’ हे भक्तीमय गीत यांचा सुरेख नजराणा या चित्रपटात आहे.

मीना चंद्रकांत देसाई, नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’ चित्रपटाच्या  निर्मात्या आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केले असून संकलन प्रशांत खेडेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर रंगभूषा सुहास गवते यांची आहे. ध्वनी विजय भोपे यांचे आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी मिलिंद सकपाळ, केदार जोशी यांनी सांभाळली आहे. संजय खानविलकर या चित्रपटाचे निर्मीती सल्लागार आहेत. सुहास पांचाळ या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘पुष्पक फिल्म’ ट्रकभर स्वप्नं हा चित्रपट २४ ऑगस्ट ला सर्वत्र प्रदर्शित करणार आहे.

Comments are closed.