टाइम बरा-वाईट – TIME Bara-Vait

टाइम बरा-वाईट – TIME Bara-Vait

Posted by mediaone - in 2015 - Comments Off on टाइम बरा-वाईट – TIME Bara-Vait

‘वेळ कोणासाठी थांबत नाही’ तसेच ‘गेलेली वेळ परत कधीच येत नाही’ म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. वेळ चुकली की पुढच्या सगळ्या गोष्टी विस्कळीत होतात हा आत्तापर्यंतचा बहुदा सगळ्यांनीच घेतलेला अनुभव… हाच विषय थोड्या हटक्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी केला आहे.वी. आर. जी. मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘टाईम बरा वाईट’ हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येत्या १९ जूनला प्रदर्शित होत आहे.

भन्नाट व्यक्तिरेखा, रोमांचकारी स्टंटस, प्रेमकहाणी आणि विनोदाचा मनोरंजक तडका असा सगळा मसाला असणारा ‘टाईम बरा वाईट’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटातील नायक राहुल आणि नायिका प्रिया यांच्याभोवती गुंफण्यात आलेली ही कथा एका वेळेवर येऊन थांबते. संध्याकाळी पाच वाजता नक्की काय होणार आहे…? नेमकं कोणतं रहस्य या वेळेत दडलंय…? आणि मुख्य म्हणजे ही वेळ कोणासाठी चांगली व कोणासाठी वाईट असणार…? हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे. संकलक म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या राहुल भातणकर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा असून त्यांनी या चित्रपटाचे वेगवान संकलनही केले आहे.

विजय गुट्टे निर्मित आणि बाहुल चौधरी, अनुराग श्रीवास्तव सहनिर्मित ‘टाईम बरा वाईट’द्वारा नेहमीच्या परिघाबाहेरील वेगळा कथाविषय हाताळण्यात आला आहे. या चित्रपटात भूषण प्रधान, संजय मोने, आनंद इंगळे, सतीश राजवाडे, ऋषिकेश जोशी, भाऊ कदम, सिद्धार्थ बोडके, विश्वजीत प्रधान, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले आदी कलाकारांसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिध्द अभिनेत्री निधी ओझा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘टाईम बरा वाईट’ची वेगवान कथा-पटकथा लिहिली आहे. अल्फान्सो पुत्रण आणि राहुल भातणकर यांनी तर संवाद राजेश कोळंबकर, राहुल भातणकर या द्वयींनी लिहिलेत.

‘टाईम बरा वाईट’मध्ये एकूण चार गाणी असून साऊथच्या तडक-भडक बिट्सचा आनंद मराठी रसिकांना याद्वारे घेता येईल. चित्रपटात ‘कादल स्नेहम मोहोब्बत’, ‘दौडा दौडा’, ‘तूतिया’ आणि ‘वाऱ्याचे गुणगुणतो गाणे’ यांसारखी विविध धाटणींची गाणी असून मंदार चोळकर आणि अभिषेक खानकर लिखित या गीतांना हृषीकेश रानडे, अजित परब आणि आदर्श शिंदे यांचा स्वर लाभला आहे. फाईटमास्टर प्रद्युम्न कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कथानकाला साजेशी साह्स्दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत.

वेळचे महत्त्व मनोरंजक पद्धतीने अधोरेखित करणारा ‘टाईम बरा वाईट’ १९ जूनपासून चित्रपटगृहात दाखल होतोय.

TIME Bara Vait in theatres from June 19th

It is a known fact that time doesn’t stop for anybody and the time which has gone never comes back. That’s the reason time has very significant place in every person’s life. All of us have faced good as well as bad times in our life. Every one of us has experienced that If one misses certain time period, it dampers one’s rest of our schedule. Director Rahul Bhatankar has tried to present this subject in a very different manner in Marathi film TIME Bara Vait. It is an action thriller film presented by VRG Motion Pictures will be released on June 19th.

TIME Bara Vait is a multi-starrer film and it is a perfect blend of unique characters, thrilling stunts and love story seasoned with comedy. The storyline of the film which is woven around lead pair Rahul and Priya comes to a stop at a particular time. What is going to happen at 5 pm? Exactly what kind of secret is hiding in that particular time frame? Most important thing is this particular time will be good for whom and bad for whom…? To watch the secret unfolding will be very thrilling experience for the audience. This is debut directorial venture of Rahul Bhatankar who is well-known as an editor of many hit films. Bhatankar has done editing of the film as well.

TIME Bara Vait which is produced by Vijay Gutte and co-produced by Bahul Choudhary and Anurag Shrivastava handles a subject which is very different from run of the mill. Actors Young Dashing Bhushan Pradhan, Sanjay Mone, Anand Ingale, Satish Rajwade, Hrishikesh Joshi, Bhau Kadam, Siddharth Bodke, Vishwajeet Pradhan, Sunil Pendurkar, Nupur Dudwadkar, Rajesh Bhosale play key roles in the film. South-Indian actress Nidhi Oza also plays a pivotal role in the film. The story and screenplay of the film is written by Alphanso Putran and Rahul Bhatankar while dialogues are penned by Rajesh Kolambkar and Rahul Bhatankar.

There are total four songs in TIME Bara Vait and the audience can enjoy the fast beats from down south through these songs. There are songs from various genres in the film such as ‘Kadam Sneham Mohaobbat’, ‘Dauda Dauda’, ’Tutiya’ and ‘Varyache Gungunato Gane’ et al. The lyrics is penned by Mandar Cholkar and Abhishek Khankar and songs are sung by Hrishikesh Ranade, Ajit Parab and Adarsh Shinde. The fight sequences which suits the fast moving storyline has been shot under the guidance of fight master Pradyumana Kumar.

TIME Bara Vait which highlights the importance of time in entertaining manner is all set to release in theatres on June 19th.

 ‘टाईम बरा वाईट’च्या कलाकारांचा ढाकिटिकी ढिन्काचिका

चित्रपटासाठी प्रमोशनल सॉंग करण्याचा फंडा सध्या जोरात आहे.  आगामी टाईम बरा वाईटया सिनेमातही प्रमोशनल सॉंगचा हा फंडा वापरण्यात आला आहे. इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याच्या उद्देशाने या प्रमोशनल सॉंगमध्ये स्पॉटबॉयपासून ते अगदी कलाकार-तंत्रज्ञांपर्यंत साऱ्या मंडळींना सोबत घेऊन हे प्रमोशनल सॉंगशूट करण्यात आलं आहे.  मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

‘तुतिया’ असे बोल असलेल्या या गाण्याला खास साउथ इंडियन स्टाईल तडका देण्यात आला आहे. हे गीत अभिषेक खणकर यांनी लिहिले असून आदर्श शिंदे यांनी या गाण्याला स्वरबद्ध केलं आहे. अजीत-समीर याचं संगीत या गाण्याला लाभलं आहे. अजय देवरुखकर यांनी हे गाणं नृत्यदिग्दर्शित केलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने वेगळे प्रयोग मराठीत होतील असे संकलक आणि दिग्दर्शक राहुल भातणकर यांनी सांगितले.

आयुष्यात वेळ कधीच, कुणासाठी थांबत नाही, आजच्या धावपळीच्या जगण्यात वेळेचं महत्त्व आपण जाणतोच. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी ही वेळ केव्हा चांगली असते तर केव्हा वाईट, याच कथाबीजावर बेतलेला ‘टाईम बरा वाईट’ हा नवा थ्रिलर अॅक्शनपट येतोय.

नेहमीच्या परिघाबाहेर वेगळा कथाविषय प्रेक्षकांना ‘टाईम बरा वाईट’ सिनेमात पहाता येणार असून मराठीतील अनेक मातब्बर कलाकार यात एकत्र आले आहेत. यात आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, भूषण प्रधान, सतीश राजवाडे, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘वी. आर. जी. मोशन पिक्चर्स प्रा. लि.’ निर्मिती संस्थेचे विजय गुट्टे यांनी ‘टाईम बरा वाईट’ चित्रपटाची निर्मिती केली असून सह निर्माता बाहुल आहेत. येत्या १९ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

Comments are closed.