‘क्लासमेट्स’ CLASSMATES

‘क्लासमेट्स’ CLASSMATES

Posted by - in 2015 - No Comments

‘मैत्री’… कुणासाठी नवचैतन्य फुलवणारी, तर कुणासाठी आयुष्य सावरणारी… मैत्रीच्या निमित्ताने अनेक बिनधास्त, बेफिकीर, आत्मविश्वासू, मनमिळाऊ, लोभस, मार्गदर्शक  उत्कट व उत्स्फूर्त, स्वच्छंदी व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि आयुष्याचा नकळत भाग होतात. त्यांच्या या हटके असण्यामुळेच कॉलेजचे मस्तमौला दिवस परिपूर्ण होतात.कॉलेजच्या छोट्याश्या अवधीत त्यांच्याशी मैत्री होते, आठवणींचा पट निर्माण होतो. पण एकदा का कॉलेजचे दिवस भुर्रकन उडून गेले कि, त्या आठवणी कायम मनात रुंजी घालतात. कॉलेजमधील अशाच जिवलग मित्रांची धमाल मौज असलेला ‘क्लासमेट्स’ हा युथफुल मराठी चित्रपट येऊ घातला आहे. युवा दिग्दर्शक आदित्य अजय सरपोतदार यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट येत्या १६ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. ‘म्हाळसा एंटरटेनमेन्ट’ निर्मिती संस्थेचे सुरेश पै निर्मित ‘क्लासमेट्स’ चित्रपटाची सह निर्मिती मिडिया मॉन्क्स यांनी केली आहे.

अंकुश चौधरी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, किशोरी शहाणे, पल्लवी पाटील अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात एकत्र आली आहे. दमदार कलाकारांची खिळवून ठेवणारी अदाकारी सोबत तरुणाईची अनोखी झिंग यात अनुभवता येणार आहे. ‘क्लासमेट्स”च्या कलरफुल टाइटल प्रमाणे याच्या ट्रेलर मध्ये ही रंगाची उधळण केली आहे जी नक्कीच डोळ्यांना सुखावणारी आहे.

‘व्हिडीओ पॅलेस’ चे नानूभाई जयसिंघानी, ‘एस. के. प्रॉडक्शन्स फिल्म’चे कोमल व संदीप केवलानी प्रस्तुत ‘क्लासमेट्स’ चित्रपटाचा ट्रेलर व यातील ‘तेरी मेरी यारीया’ व ‘बिनधास्त बेधडक’ ही गीते सध्या युट्युब व संगीत वाहिन्यावर गाजताहेत. चित्रपटाच्या संगीतासाठी अविनाश – विश्वजीत, अमितराज, पंकज पडघन व ट्रॉय – अरिफ या संगीतकारांनी खूप मेहनत घेतली असून प्रत्येक गीत आजच्या पिढीला आकर्षित करेल याकडे त्यांनी विशेष भर दिला आहे. चित्रपटातील गीते गुरु ठाकूर, मंदार चोळकर, क्षितीज पटवर्धन, विश्वजीत जोशी या गीतकारांनी तितक्याच तरलतेने लिहिली आहेत.

आपल्या कॉलेजमधील आज आपल्याला कोणी भेटलं कि आपण एकदम ‘फ्लॅश बॅक’ मध्ये जातो..  कॉलेजच्या आठवणीत जपलेल्या त्या उत्कट क्षणांना, हळुवार अनुभवांना आणि दुसऱ्यांना आनंद देताना अशाच चांगल्या मैत्रीची गरज लागते. कॉलेजमधील दिवसांच्या अशाच अनेक आठवणींचे कोलाज आपल्याला या सिनेमात पहाण्याची संधी मिळणार आहे. सत्या, अनिरुद्ध, अप्पू, आदिती, रोहित, प्रताप, अमित, हिना या साऱ्यांच्या अनोख्या मैत्रीची कथा ‘क्लासमेट्स’ मध्ये रेखाटण्यात आली आहे. क्षितीज पटवर्धन, समीर विध्वंस यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संवाद क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेत. के. के. मनोज यांनी चित्रपटाचे देखणे छायांकन केले असून मनोहर जाधव यांनी कला दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. ‘क्लासमेट्स’ मधील प्रत्येक कलाकारांच्या व्यक्तिरेखेला साजेशी वेशभूषा मनाली जगताप यांनी डिझाईन केली असून चित्रपटाचे संकलन इम्रान – फैझल यांनी केलंय. मनोहर वर्मा या साहस दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली यातील साहस दृश्य चित्रीत झाली आहेत.

१६ जानेवारीला ‘क्लासमेट्स’ तुम्हाला पुन्हा नव्याने कॉलेज जीवनात घेऊन जाईल हे निश्चित !

CLASSMATES

Do you miss your college days?

The old benches, bunked lectures, morning shows, marathon chats in  the canteen, cutting chai, rose day, sports week, funny gatherings, and most importantly your Classmates?

 It’s time to revisit and time to open that gate and enter in the world again, because it’s time for “CLASSMATES”. 2015’s most anticipated Marathi feature film.

The story revolves around a group of students from 1995 batch, who meet for a get together in the college premise.

Visit all those years, packed with insane fun, eternal friendships, blossoming romance, changing loyalties, future shaping decision and teaching of life.   It’s exciting to see how these years changed the life of these CLASSMATES forever.

 Get ready for a cracking entertainer. Reunion 16th Jan 2015

Video Palace and SK Productions Films (Komal & Sandeep Kewlani) in association with Media Monks presents a Mahalasa Entertainment Production by Suresh Pai comes with one of its kind re-union ‘CLASSMATES’.

The movie will offer power packed performances of talented actors Ankush Choudhary Sai Tamhankar, Sonalee Kulkarni, Sushant Shelar, Sachit Patil, Siddharth Chandekar, Suyash Tilak, Pallavi Patil to mention few. Sanjay Mone, Kishori Shahane and Ramesh Deo are also playing key roles standing strong with theo8ir exceptional performance. 

Music is done by Amitraj, Pankaj Padgham, Avinash-Vishwajeet and Troy-Arif

“Classmates will offer something to everyone. There if fun, college, friendship, love, promises and more. There will certainly be several surprise elements hidden which will be slowly unconfined towards the movie release on January 16, 2015.

The film is directed by Aditya Ajay Sarpotdar, produced by Suresh Pai, screenplay by Kshitij Patwardhan and Sameer Vidwans, dialogues by Kshitij Patwardhan while director of photography by K.K.Manoj, edited by Imran-Faisal, music is manned by Amitraj, Avinash-Vishwajeet, Troy-Arif and Pankaj Padghan on the beautiful lyrics of Kshitij Patwardhan, Guru Thaakur, Manndar Cholkar and Vishwajeet Joshi, art director Manohar Jadhav, costume designer Manali Jagtap and action director Manohar Verma.

Post a Comment