अभिजीतची भीती

अभिजीतची भीती

Posted by mediaone - in Blog, News - Comments Off on अभिजीतची भीती

‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ असे आपण अनेकदा म्हणतो. प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कशाची न कशाची तरी भीती असतेच आणि हे अगदी नैसर्गिक आहे. पण काहींमध्ये भीतीचा अतिरेक दिसून येतो. अभिनेता अभिजीत खांडकेकरलाही सध्या भीतीने ग्रासले आहे. अभिजीतच्या मनात नेमकी कसली भीती आहे? हा प्रश्न तुम्हला पडलाच असेल याचं उत्तर तुम्हाला १६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत व सचिन कटारनवरे निर्मित भय या आगामी सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन व संकलन राहुल भातणकर यांनी केले आहे.

‘माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी व चॅलेजिंग असल्याचं सांगत, भय हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की खिळवून ठेवेल’ असा विश्वास अभिजीतने व्यक्त केला. या सिनेमात भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंतवून टाकणारा प्रवास पहायला मिळणार आहे.

भय सिनेमात अभिजीत खांडकेकरसह उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे,  विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, धनंजय मांद्रेकर, नुपूर दुधवाडकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते अजय जोशी असून आशिष चौहान कार्यकारी निर्माता आहेत. सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. कथा-पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक अजय देवरुखकर असून सिनेमॅटोग्राफार राजेश राठोर आहेत. १६ डिसेंबरला भय प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.