‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव

‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव

Posted by mediaone - in Events - Comments Off on ‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव

रसिकांच्या पाठिंब्याने अजरामर झालेलं व रंगभूमीचा एक काळ गाजवणारं ‘अपराध मीच केला’ हेनाटक नव्या रुपात आणि नव्या संचात आणण्याचं धाडस निर्माते किशोर सावंत व विवेक नाईकयांनी केलं. किवि प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून रंगभूमीवर आलेलं नव्या संचातलं हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं असून शुक्रवारी १८ ऑगस्टला रात्रौ ८.३० वा. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग रंगणार आहे.

नाटकाची ही रौप्य महोत्सवी वाटचाल आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून याचे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस निर्माते किशोर सावंत यांनी व्यक्त केला. नाटकाचे दिग्दर्शन विजय गोखले यांनी केले असून रमेश भाटकर, विजय गोखले, विघ्नेश जोशी, किशोर सावंत, संजय क्षेमकल्याणी, विलास गुर्जर, यश जोशी (बालकलाकार), सुमंत शिर्सेकर, निशा परुळेकर, प्रियंका कासले यांच्या भूमिका आहेत.

Comments are closed.